तुला हवं होतं ना कि मी तुझ्याशिवाय जगावं, तुला माझ जग मानलं होत मी, पण तुझ्याविनाहि माझ एक जग असावं. तू दूर गेल्यावर मी रडावं पण रडत रडत का होईना स्वताची वाट स्वत शोधावी. नव्या आयुष्याकडे चालावं. तू माझा श्वास आहेस, तू माझ्या साठी जगण्याचा आधार आहेस, पण तुला मी स्वताच्या हिमतीवर उभी हवी आहे.
तू दूर जातोयस कारण तुला माझ्यातली मी बाहेर आणायची आहे, तुला हवंय कि रोज सकाळी मी उठेन तेव्हा माझ्या मनात पहिला विचार हा नसावा कि तुझा दिवस कसा असेल, तर हा हवा कि माझा दिवस कसा जाईल. तुला वाटतंय कि मी माझ्यासाठी हसावं, माझ्यासाठी रडावं. माझ्या मनातल्या भावना तुझ्यावर विसंबून नसाव्या, मी माझ्या दृष्टीनी जग पहाव, मी माझ्या मनाने विचार करावा. मी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. मी स्वतःच सुख स्वतः शोधावं. माझी पहाट मी डोळे भरून पहावी, माझी रात्र मी स्वप्नांनी भरून टाकावी.
तू मला सोडून चाललाय कारण मला मी सापडावी.
सगळ मान्य आहे मला, तुझ्या शिवाय स्वताला संभाळण, तू नाही याची सवय करून घेण, तुझा विचार न कारण, तुझी काळजी न घेण. आपलं आयुष्य आपण सांभाळण, तुझ्यापासून लांब राहाण…. तू नाहीस आता, तरी मी जगते, मी उठते, मी काम करते, जेवते, झोपते, मी रडते, मी हसते, गाते आणि कधी कधी तरी चक्क नाचते.
पण तरीही तू गेल्यापासून ह्या भावना मनाला भिडत नाहीत, हसते तर हसू ओठांतून मनापर्यंत जात नाही, रडते तर अश्रू डोळ्यातून मेंदूपर्यंत जात नाहीत. तू नाही तर एका पोकळी आहे झालेली ती भरून येत नाहीये काहीही करून. मझ्या जगण्याची दिशा बदलत असेल कदाचित पण मन अजूनही तुझ्याकडेच धाव घेतंय.
तुझ्यापासून दूर, तुझ्याशिवाय जगतीये मी. पण तुला माझ्यातून कसं वेगळ करू?
तुला विसरून, तुझ्या मदतीशिवाय जिवंत आहे मी, पण ह्या जगण्याला जगणं तरी कसं म्हणू?
खूपच छान…
कुठल्यातरी जुन्या आठवणी डोळ्या समोर उभ्या राहिल्यात
पण ह्या जगण्याला जगणं तरी कसं म्हणू… खरच
अवघड असतं काही वेळा सगळं…
khup chan
…
“तू दूर जातोयस कारण तुला माझ्यातली मी बाहेर आणायची आहे”..?
अजब logic आहे ग. ! नाही पटत…
पण बाकी लेख खूप सुंदर. एकदम खरा. “पण तरीही तू गेल्यापासून ह्या भावना मनाला भिडत नाहीत, हसते तर हसू ओठांतून मनापर्यंत जात नाही, रडते तर अश्रू डोळ्यातून मेंदूपर्यंत जात नाहीत. तू नाही तर एका पोकळी आहे झालेली ती भरून येत नाहीये काहीही करून.” खरा खुरा..
अजब आहे खर, न मान्य तर मला पण नाही , होत असं पण… आपण त्या व्यक्तीमध्ये, नात्यामध्ये इतके गुंतून जातो कि स्वतःलाच विसरतो…
आणि मी लेख म्हणून लिहिलच नाही, मनात आल आणि लिहित गेले. खूप Thanks N ….
ह्म्म्म्म…… आपण त्या व्यक्तिमध्ये, नात्यामध्ये इतके गुंतून जातो कि स्वत:लाच विसरतो…. असच होतं हे खरचं पण म्हणून त्यावर हा असा उपाय….??? अशी नात्यातली गुंतवणूक काढून घेता आली असती तर मग लांब जाण्याचा पर्याय अवलंबावा लागलाच नसता नं… अन लांब जाऊन तरी कुठे गं सुटतेयं… त्यापेक्षा जवळ राहूनच हे सारं कसं जमेल हे पाहायला निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे….. अर्थात ही माझी भावना… अमृता, खूप आतून लिहिलसं… भिडलं.
पण नात टिकवायला दोन्ही बाजूनी प्रयत्न हवेत न, जर एकानी बाहेर जायचं ठरवलं तर दुसऱ्यानी काय कराव, When I replaces WE in a relation…. its better to remove the I, rather than sacrificing the WE… हे योग्य नाही का?…
खरेयं तुझे. त्या We तला जीवच संपला असेल तर उगाच कशाला फरफटत राहायचे. बोलूच ग आज.