आपल्याच चुकांचे वेडेवाकडे घाव, सलत राहतात आणि मग जखमा होतात.
चिघळत जातात दिवसेंदिवस…
दुखतात, कधी खुपतात आणि बोचतात
सुखाची झळ सोसत नाही स्वतलाच, मग दुखाची कशी सोसेल
एकमेकांत रुतून बसलेल्या काटेरी भावना, बोथट झाल्या तरी रक्त काढतात..
नुसत्या शब्दांची तीक्ष्ण धार कापून जाते, मनाची लक्तरं दिसू लागतात
वेशीवरती टांगलेली, उघड्यावर लटकलेली..
आणि रोज रोज लिलावात निघणारी
ती दिसतात सगळ्यांना पण कोणाच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत
सगळ संपल्याची जाणीव होते पण मेंदूपर्यंत जायची राहते
संवाद संपतात सारे, जगाशी आणि स्वतःशी
हरून जातो, एकटे पडतो..
गरज असते एका भ्रमाची, सत्याला हरवण्याची
पण त्यासाठी आपण जगतोय हा भ्रम केवळ ठरत नाही
आणि जगण्यासाठी श्वास सुरु आहे हाच पुरावा पुरेसा ठरत नाही.
एकाच वर्तुळाच्या परिघावरून आपण धावत राहतो
सतत केंद्राबिंदुला समांतर….
पण धावून धावून सुद्धा तिथपर्यंत कधीच पोहोचत नाही
बापरे…
भावनाकल्लोळ! खूपच गुंतागुंतीच्या भावना व्यक्त केल्यात!
हम्म, मनात गोंधळ उडाला होता, मग जे डोक्यात आल ते उतरवत गेले.
tuzya manatla vyakta kelas watata tu
हो एकदम बरोबर. Thanks
सुरुवातीपासुन शेवट्पर्यंत एकदम सॉल्लीड लिहल आहेस….
=>एकाच वर्तुळाच्या परिघावरून आपण धावत राहतो
सतत केंद्राबिंदुला समांतर….पण धावून धावून सुद्धा तिथपर्यंत कधीच पोहोचत नाही
आपल आयुष्य असाच असता न, कितीही पुढे गेलो तरी जे हव ते आपल्या पासून तितकंच पुढे जाणवत.
अशा सगळ्या भावना…कशा काय लिहू शकतेस..? छान आहे… जे वाटतंय, ते लिहिता येणा, अवघड आहे जरा!
thodya samjyala sopya kavita lihit ja ga
सतत केंद्राबिंदुला समांतर….
faarch chhan aahe kavita…