पहिलंवाहिलं

जसं नवीन घरात नव्या नवरीचं पहिलंवाहिलं पाऊल पडावं, तसं आज ह्या blog जगतात माझ पहिलं पान…………….

बऱ्याच दिवसांपासून हे खूळ डोक्यात होतं, शेवटी आज श्रीगणेशा झालाच. म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची काळ आणि वेळ ठरलेली असते आणि कदाचित ती तेंव्हा झाली तरच त्याच विशेष..
असंच काहीस असावं कदाचित,

आज पहिला blog  म्हणून माझी सर्वात पहिली कविता आज post  करते आहे..
सर्व वाचकांना आवडावी एवढीच माफक अपेक्षा….

 

पहिला वारा पहिला पाउस
सगळ काही नवंनवं
अनुभवायचं असेल हे जग
तर मनातही तितकं प्रेम हवं

छोटीशी झुळूक वाऱ्याची
धुंद करणारा वास मातीचा
वेड्यासारखा भरून टाकतो
गंध ओल्या आठवणींचा

हुरहूर दाटते मनात
विचित्र पोकळी एकटेपणाची
मिटून घेतले डोळे कधी
तर जाणीव तुझ्या सहवासाची

तू अन् मी नाही वेगळे
प्रकर्षाने जाणवतंय मला
जवळ आहोत एकमेकांच्या
कदाचित हेच सांगायचं या पावसाला

म्हणावस वाटतंय त्याला
उद्यासुद्धा ये बरसण्यासाठी
पण येताना मात्र
सोबत तुलाही घेऊन ये माझ्यासाठी

Advertisements

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to पहिलंवाहिलं

  1. Sheetal म्हणतो आहे:

    छान आहे. ब्लॉगसाठी शुभेच्छा!
    keep writting..

  2. Shilpa म्हणतो आहे:

    खूपच छान .. असेच अजून छान छान वाचायला मिळावे हीच माफक अपेक्षा..:)
    All the Best!!!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s