उत्तरं माहित असलेले अन्नुत्तरीत प्रश्न

 प्रश्न १ ला : 
रात्री ९ ची लोणावळ्याहून पुण्याला जाणारी लोकल. Ladies डब्बा, अगदी तुरळक १०-१५ प्रवासी. 
साधारण ६०च्या आसपासच्या आजी, बहुतेक काश्मिरी. अंगात स्वच्छ धुतलेला पण जुना चिकन वर्कचा पंजाबी, गळ्यात मंगळसूत्र, हातात कडे, कपाळाला मोठ्ठी टिकली, गोऱ्यापान आणि खांद्याला नि हातात २-३ पिशव्या. चीलीमिली लेलो, गोलवाले लेलो, fast का चिप्स लेलो असं ओरडत डब्यात फिरत होत्या.
आता १०-१५ प्रवाश्यामधून १-२ जणींनी काही तरी घेतलं, मग त्या माझ्या समोरच्या बाकावर येऊन बसल्या. शेजारच्या आजींची आणि त्यांची बडबड सुरु झाली. त्या सांगत होत्या स्वतःच्या बद्दल, त्यांची वाक्य त्यांच्याच भाषेत,
“अब क्या बताऊ, इस उम्रमें कमर तो दर्द करती ही है, लेकिन कोई चारा नहीं, जिन्दा तो रहना पड़ता है. और उसके लिए पेट भी भरना पड़ता है. हा २ २ लडके है, लेकिन अब वो बड़े हो गए, घर उनका है, चाहे जिसे घर में रखे, चाहे जिसे निकाल दे. हम क्या कर सकतें है. किसी दुसरे के आगे हांजी हांजी करने से अच्छा है अपना काम करो और इज्जत से जियो. बच्चोको पढाना लिखाना तो अपना फ़र्ज़ होता है, उसके बाद बच्चे क्या सिलाह देते है प्यार का वो उनकी इच्छा. हमारा तो आशीर्वाद है उनके साथ बस.
आज कल हम जैसे गरीबों का कौन सुनाता है भला? अमीर औरभी  अमीर हो गए है और गरीब औरभी गरीब. लेकिन इन अमिरोंसे तो बाबा दूर ही रहना अच्छा है. इनके सीनेमें तो दिल होता ही नहीं है, खून भी काला होता है इनका.  
एक गरीब दुसरे गरीब की मदद करने के लिए अपना पेट भी काट के देता है, सामने वाले को इन्सान समज़ता है. लेकिन ये अमीर लोग अपनी कामवाली को भी पुराना, बासी खाना देते है, बहोत काम करवाके लेते है.
अब है जिंदगी ऐसी तो क्या करनेका? जी लेते है जैसी है वैसी. जब तक साँस है तब तक काम करेंगे, वरना तो भगवान का घर है ही मुफ्तमे रहने के लिए.”

काय माहित त्यांनी काय काय पाहिलं होत आयुष्यात. स्वताच्या मुलांनी घराबाहेर काढलं, पोट भरण्यासाठी धुणीभांडी करावी लागली, अजून काय काय. असे का वागतात लोक जगात? पैश्याचा माज इतका का चढतो?

 प्रश्न २ रा :
माझी खूप चांगली मैत्रीण. college मध्ये last year ला होती. आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेलेली.  वडील काळजीने आणि कष्टाने चिडचिडे झालेले. मोठी बहिण २ वर्षापूर्वीच कोणाचा तरी हात धरून पळून गेलेली.
अचानक एक दिवस ध्यानीमनी  नसताना वडिलांना attack येतो आणि  ते जागीच्या जागीच जातात. इतका मोठा धक्का कि तिच्या डोळ्यातलं पाणी पण सुकत. एकुलता एक आधार पण तुटतो. शेजार मात्र खूप चांगला. प्रचंड मदत करतात, आपलं समजून. बहिणीला पण phone करून बोलावून घेतात.
बहिण येते, रडायला एक खांदा मिळतो आणि मन मोकळ करायला दुसर मन. कसे तरी ६ ७ दिवस जातात. अचानक एक दिवस बहिण  बँकेचे कागद घेऊन , Locker मधून समान घेऊन येऊ म्हणते बाबांच्या. दोघी जातात आणि सामान घेऊन येतात. एक दोन FD, थोडी कॅश, आईचे दागिने, चांदीची २ ४ भांडी.
बहिण म्हणते, आईनी हे दागिने आणि भांडी माझ्यासाठी ठेवली होती. तिचं खूप प्रेम होत माझ्यावर. तिची आठवण म्हणून मी घेऊन जाते. दुसऱ्यादिवशी पहिल्या बसनी निघून जाते. दहाव्याला पण थांबत नाही.
हि परत एकटी आणि आतून पूर्णपणे तुटलेली. पण काय करणार जगाव तर लागतच ना. ३ वर्ष होत आले आता या गोष्टीला. बहिणीचा परत काही संपर्क नाही. एकटीच राहते, कॉलेज पूर्ण केल, Gym trainer चा course केला. खूप मित्र मैत्रीण जोडले. सतत हसरा चेहेरा, पण आतली जखम अजूनहि ओलीच. 
सख्खे सख्ख्याशी असं वागू शकतात? पैसा पैसा ठीक आहे, पण रक्ताचं नात तरी जपावं. आपण एका आईच्या पोटी जन्म घेतला, त्या उदराचा तरी आदर असावा.
 
प्रश्न ३ रा :
ज्युनिअर कॉलेजला जाणारी ती. आई वडील निरक्षर, गावाकडे शेती करणारे. सातवीत असतानाच शहरात काकाकडे राहायला आलेली. सावळीशी, पण दिसायला नीटस, साधीसुधी, हसरी. काकू नाही म्हणाल तरी तशी खाष्टच, मारझोड, शिव्याशाप नाही पण टोचून बोलणारी. काकांचा आणि घराचा संबंध फक्त जेवण्याझोपण्यापुरता. काकाची मुलं लहान. शाळा पण यथातथाच. मैत्रिणी पण तिच्यासारख्याच गावाकडून आलेल्या.
एकंदरीत आयुष्य अगदी चाकोरीतलं, साधं. मग एक दिवस तिला रस्त्यानी जाताना कडेला ती मुलं दिसतात. तशी रोज ती तिथच उभी असतात, पण आज त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येयील इतपत मोठा. बोलण कळत नाही पण एकाच नाव ऐकू येत राहत सतत. ती ऐकून ना ऐकल्यासारख दाखवत निघून जाते.
मग हे रोजचंच. आता तिला हे पण माहित आहे कि ज्या मुलाचं नाव ती ऐकते तो कोण आहे. आणि तिला हे पण माहित आहे कि तो तिच्याकडेच पाहत असतो. तिला पण त्याच पहाण आवडत असत. मग एक दिवस तो  direct बोलायला येतो. आधी भांबावून गेलेली ती अर्ध्या तासात normal होते.
१६-१७ वर्षाची मुलगी. कळत्या वयात आई वडिलांपासून, त्याच्या प्रेमापासून दूर नातेवाईकांकडे राहणारी, प्रेमाची अपेक्षा काय ठेवणार? आणि मग असं नाजूक वयात कोणाला आपणहि आवडतो हे ऐकून हुरळून जाणार नाही तर काय.
मग ती व्यक्ती कोण आहे, काय आहे, कशी आहे हे बघायला डोळे उघडे तर पाहिजेत ना. ते तर कधीच स्वप्नाच्या ओझ्यांनी मिटून गेलेले. प्रेमाच्या अनोख्या वाटेवर चालताना आजूबाजूच्यांनी किती सांगितलं कि, अगं तो दहावी पण पास नाहीये, काही काम धंदा करत नाही. टवाळक्या करत असतो, गावाचा गुंड आहे. पण तिला तो तिच्या स्वप्नातला राजकुमारच वाटतो.
शेवटी काय? त्याच्या प्रेमात भारावलेली, त्याच्याच सल्यानुसार, आपल्या १८व्या वाढदिवसाच्या दिवशी घरातून पळून जाते. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याशी लग्न करून मोकळी(?) होते.
मग ६ 7 महिन्यांनी ती दिसते. डिप्लोमाच्या कॉलेज मध्ये, admission घ्यायला आलेली. एकटीच, जरा दुर्मुखलेली. अंगावर भडक रंगाचा ड्रेस, गळ्यात मोठ्ठ न शोभणार मंगळसूत्र, हातात डझनभर बांगड्या. थापलेला make-up. जाताना सांगून जाते. झाली ग माझी admission . जरा बर वाटत आपल्याला. पण १०-१२ दिवसातच परत नाहीशी होते. काही महिन्यांनी एक दिवस रस्त्यात भेटते. आई होणार असते, चेहेऱ्यावर थकवा आणि जरा लागलेलं. विचारलं तर म्हणते, अगं आता बाळ येणार आहे ना म्हणून थकलेली वाटते. आणि डिप्लोमा काय तो नंतरहि घेता येईल  पण ह्यांना घराकडे  दुर्लक्ष चालत नाही.
घराकडे दुर्लक्ष चालत नाही कि हिनी शिकलेलं चालत नाही? आणि बाळ येणार आहे ते संसार वाढवा म्हणून कि हिनी घरात बांधलेलं रहाव म्हणून?
 
 
असे कितीतरी प्रश्न, घटना असतात, अजून खूप काही मनात आहे, लिहायचं आहे. पण डोक्यातली विचारांची  गर्दी शब्दाच्या हाताला धरून बाहेरच येत नाहीये. जोपर्यंत त्या गर्दीची पांगापांग होत नाही तोपर्यंत समोरचा रस्ता दिसण जरा अवघडच. म्हणून सध्या इथेच थांबते.
Advertisements

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

20 Responses to उत्तरं माहित असलेले अन्नुत्तरीत प्रश्न

 1. Dhiraj म्हणतो आहे:

  heart touching!!!!

 2. jeevan म्हणतो आहे:

  manala bhidnarya gosti aahet

 3. justtypeamruta म्हणतो आहे:

  Thanks धीरज आणि जीवन 🙂

  – अमृता

 4. Smit Gade म्हणतो आहे:

  really touching…

 5. Ajay म्हणतो आहे:

  अमुता,

  तिन्ही प्रसंग पुन्हा पुन्हा वाचले आणि पुन्हा तेच जाणवलं. आपली दु:ख यांच्यापुढे फिकीच नाही का ?
  खुप सुंदर लिहील आहेस. अगदी हदयाला भिडणारं.

  -अजय

  • justtypeamruta म्हणतो आहे:

   खर आहे तुझ अजय. In fact तुझी post वाचल्यानंतर मला ह्या सगळ्या घटनांचीच प्रकर्षाने आठवण झाली होती. ह्या post च inspiration तिथूनच मिळालं अस म्हणू शकते मी.
   माझी post समोरच्याच्या मनाला भिडली यातच सगळ आलं. Thanks

 6. महेंद्र म्हणतो आहे:

  सेंटी झालंय पोस्ट.. छान आहे..

  • justtypeamruta म्हणतो आहे:

   मला पण असंच वाटतं होत. म्हणूनच हे post टाकावं का नहीं ह्याबद्दल बरेच दिवस confusion होत. Finally here it is.

 7. Deep म्हणतो आहे:

  Hey can u pls increase d font size??

 8. Manmaujee म्हणतो आहे:

  हे प्रश्न अनुत्तरतीत राहीलेलेच चांगले कारण या उत्तरांमागचे वास्तव खूप त्रास देनारं असत अन् अश्या परीस्थीतीमध्ये आपण फक्त हतबल असतो!!!

  खूप भावनिक पोस्ट आहे ही!!!

  • justtypeamruta म्हणतो आहे:

   मनमौजी, खरय तुमचं. पण ह्या सगळ्या घटना पहिल्या कि असा वाटत माणसांनी चंद्र-सूर्यच काय पण अगदी दुसऱ्या galaxi पर्यंत जरी प्रगती केली तरी त्याचा स्वार्थ आणि पैश्यासाठी हपापलेपणा काही कमी होणार नाही. Its all very sad but still true.

 9. Shilpa म्हणतो आहे:

  जगामध्ये खरेच अशी लोक असतात ते वाचून खूपच वाईट वाटले .. देव करो आणि असा अनुभव कोणाला हि न येओ.. बाकी पोस्त खूप छान झाले आहे ..
  पोस्त आधीच वाचले होते पण प्रतिक्रिया देण्याचा आळशी पण केला..:)

 10. ashuraj म्हणतो आहे:

  hmmmmmm…… पोस्ट तर छान आहेच. तुझा ब्लॉग वाचण म्हणजे एक अमृतानुभव असतो. btw, mark my words… तुझ्या हातून एखाद सामाजिक कार्य घडणार आहे… नक्की.(ही आशुवाणी आहे…:))

 11. sahajach म्हणतो आहे:

  तीनही प्रश्न बोचणारे आहेत गं!!!! नुकतचं मी माझ्या अगदी जवळच्या माणसाला असे उध्वस्त होताना पाहिलेय…..सख्खे भाउ आपल्याला पैश्यासाठी जवळ करतात हे सत्य अकल्पितपणे असेच समोर आल्यावर अशीच बिकट अवस्था पाहिलीये मी!!!!!

  बाकी तू लिहलेयेस मनापासून….

 12. bhagyashree म्हणतो आहे:

  aavadla post. ase barech prashn manat chhaLat asatat khare! 😦

 13. bhaanasa म्हणतो आहे:

  अशाचवेळी आपल्या माणसांची खरी रुपे दिसून येतात हेच खरं. पैसा आणि मतलब हे दोन राक्षस कधी कोणाच्या मनाचा कसा लचका तोडतील….. मग निर्माण होते प्रश्नांची मालिका…. हीच का आपली माणसे? आपली आहेत तर मग अशी का आहेत? उत्तरे नसलेले-आयुष्यभर लचके तोडणारे-नावाचेच आपले…. अमृता, पोस्ट भावली गं.

  • justtypeamruta म्हणतो आहे:

   व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, पण काही प्रवृत्ती तर इतक्या मनाला चटका लाऊन जातात,
   मानलेली नाती जपणारे किती तरी लोक बघितले मी, त्या पुढे हे असे कोत्या मनोवृत्तीचे लोक पहिले कि खर प्रश्न पडतो, नक्की हे जग एकच, का वेगवेगळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s