फूल सा है खिला आज ………..

 
 
साधारण एक महिन्यापूर्वीची गोष्ट. एक दिवस अचानक बाबा घरी ४-५ रोप घेऊन आले. २ जास्वंदीची, २ मोगऱ्याची आणि एक तुळशीच.
खर तर गेले कितीतरी महिने माझी आणि आईची इच्छा होती झाड लावण्याची. आमचं स्वतःच घर आहे तसं. आम्ही राहतो वरच्या मजल्यावर. खाली माझे काका-काकू राहतात. त्यामुळे वरती झाड लावायला गच्ची सोडून दुसरी जागाच नव्हती आधी आणि गच्चीत लावलेले झाड उन्हानी लगेच मारून जायचं. म्हणून एक-दोन प्रयत्न fail झाल्यानंतर मी झाड लावायचा नादच सोडला. पण काही महीन्यांपुर्वी आम्ही बाहेरून  लोखंडी जिना काढला आणि त्या जिन्यात थोडीशी जागा मुद्दामून ठेवली झाडं लावायला. (हि आयडिया मात्र आईची, मला कुठली इतकी अक्कल :P).
 
मग तेंव्हापासून दर शनिवारी आणि रविवारी रोप आणायचा निर्धार व्हायचा आणि अर्थातच सपशेल फसायचा. नाही म्हणायला कुंड्या तेवढ्या आणून ठेवल्या आम्ही. मग बाबांनी ती रोप आणल्यावर मी वेडीच व्हायची बाकी होते. मला आणि आईला प्रचंड वेड आहे झाडाचं. फळझाड, फुलझाड, मनीप्लांट, शो ची झाडं…. काही विचारू नका.  ती रोप घरात आल्याआल्या १ तासाच्या आत आपापल्या कुंडीत विराजमान झाली होती. आणि पाहुण्यासारख आरामात डोलत खत आणि पाण्याचा आस्वाद घेत होती.
 
२ दिवसातच त्यातच एक मोगऱ्याच रोप वाळून गेलं. ४ दिवस सलग त्याला पाणी घालून वाचवायचा प्रयत्न केला पण ते तरारलं नाही ते नाहीच. (जरा शंका आली म्हणून बाबांना विचारलं रोप कुठून आणली, तर म्हणाले शेजारच्या सरकारी नर्सरीतून. मग काय अपेक्षा ठेवणार इथं? ). पण लगेचच दोन्ही जास्वंदाच्या रोपांना नवीन टोक आलेली वाटली. म्हणालं नशीब माझ, कळ्या धरल्या वाटत.
 
झालं, आई आणि माझं रोज च कळीनिरक्षण सुरु.  रोज ऑफिसला जाताना कळी आली का ते बघायचं (मग नंतर बस पकडायला पळावं लागलं तरी नो प्रॉब्लेम!!) आणि परत आल कि आईकडून latest updates. पण थोड्या दिवसातच कळलं कि ज्याला आम्ही कळी समजत होतो, ती तर पालवी होती. (अपेक्षाभंगाच हे दुखः मी कितीतरी वेळा अनुभवलं आहे 😦 ).  मग रोज त्या कळीची वाट पहाण सुरु. प्रत्येक वेळी वाटायचं कि आता तर आली कळी, पण प्रत्येक वेळी आमचं,  “दिल के अरमां आसुओंमे बहे गए ” . व्हायचं.
 
काल सकाळी मात्र अचानक आई जिन्यातून वर येत होती. अचानक मला हाक मारायला लागली. मला वाटल पाय बिय मुरगळला का काय (पडली असती तर आवाज आला असता म्हणून तो option रद्द होता). बघते तर ती झाडच निरीक्षण करण्यात गुंग. मी पण जवळ जाऊन पाहिलं तर अहो आश्चर्यं.
 
छोट्याश्या पानाच्या खाली, पिटुकल्या फांदीला धरून, एक टिचुकली कळी. लालचुटुक शेंडा असलेली. आईशप्पथ, काय सही आहे ती. काळ पासून दर १० मिनिटांनी अर्धा जिना उतरून ती कळी पहाण सुरु आहे माझं.
 
 
 
आत्ता संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर  काढलेला हा आमच्या कळीबाईंचा फोटो. दाद द्यायला विसरायचं नाही.
 
 
स्वतःच्या कोषात राहण्याची तुझी सवय तशी जुनीच आहे
पण जेंव्हा त्यातून येते बाहेर तुझी सय
तेंव्हा त्या कोषाची पण महती असते गोडवे गाण्याजोगी
सृजनाचा आनंदच असतो ना असा निराळा
हजार कळा सोसल्या असतील तू,  तरी आता डोळ्यात आलेला तो अश्रू तसा वेगळाच  

 

Advertisements

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

9 Responses to फूल सा है खिला आज ………..

 1. Ajay म्हणतो आहे:

  बाकी आवाज येण्याच आणि पाय मुरगळण्याच तुझं लॉजीक भारी बरं का ! अपेक्षाभंगाच दु:ख प्रत्येकालाच आयुष्यामध्ये कुठे ना कुठे भोगावं लागतं. तुझी कळीबाई मस्त आहे, तो लवकरच फुलो.

  -अजय

  • justtypeamruta म्हणतो आहे:

   सगळ्यात पहिली comment आणि ती पण इतक्या fast दिल्याबद्दल थांकू. फिल्म वर एखादी पोस्त टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन रे.
   -अमृता

 2. Shilpa म्हणतो आहे:

  अग किती छान लिहिले आहेस तू.. ”छोट्याश्या पानाच्या खाली, पिटुकल्या फांदीला धरून, एक टिचुकली कळी” एकदम मस्त. आता जरा मी सुद्धा आमच्या बागेकडे लक्ष द्यावे म्हणते..:)

 3. ashuraj म्हणतो आहे:

  सही पोस्ट. एकदम इनोसेंट.
  लगे रहो….

 4. sahajach म्हणतो आहे:

  सुंदर आहे तुझा लेख आणि ती पिटुकली कळी सुद्धा……तुझा ब्लॉग आधि कसा पाहिला नाही मी?????
  असो better late than never…….आता सगळे पोस्टस वाचून काढते!!!!!
  तन्वी

 5. YD म्हणतो आहे:

  Mastach lihile ahes. Mazee comment yeiparyant Kali umalalee asel 😀
  [Aagaupana – Todu naka jamala tar]

 6. आनंद पत्रे म्हणतो आहे:

  छान वाटलं वाचून….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s