तुझ्यापासून दूर गेल्यावर……..

मीटर किलोमीटरची मापं मागे पडत जातात,
जाणवतात ती श्वासांमधली अंतरं…
तुझ्यापासून दूर जाताना मला आठवत राहत तुझ्या जवळ येण,
 
तुझ वेड प्रेम, तुझी वेडी स्वप्न, तुझ्या गहिऱ्या डोळ्यातली माझी मूर्ती
तुझ्या मनातली माझ्यासाठीची माया,  तुझ्या शब्दांमधली माझी वेडी स्तुती
 
तुझ्या मनातले ते कोपरे जे खुलतात माझ्यासाठी
कधी न कळणारे काही तुझे भाव जे उमलतात फक्त माझ्यासाठी
तुझी वेडी आशा, तुझ्या पदरी आलेली कधी निराशा,
माझ्यावर प्रेम करताना तुझ्या डोळ्यात आलेली चमक,
मी तुला दुखावलं कधी नकळत तर तुझ्या डोळ्यात आलेले ते अश्रू,
 
मी जवळ नसले कि होणारी तुझी घालमेल, मला जपण्यासाठी तुझी होणारी धडपड
माझ्या ओठांवर हसू याव म्हणून होणारी तुझी तडफड
 
माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझा जडवला होता स्वर कधी,
मला निरोप देताना तुझे संपले होते शब्द कधी
माझा आवाज ऐकल्यावर तुझे संपले होते विचार तेंव्हा,
माझा स्पर्श  होईना म्हणून बधीर झाले होते तुझे हात तेंव्हा
 
आता मी आहे दूर खूप तुझ्यापासून,
पण तरी आहे मी तुझ्या मनात
तुझ्या हृदयातले भाव जाणवतात मला,
फक्त तुझ प्रेम आहे आता माझ्या मनात
Advertisements

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

7 Responses to तुझ्यापासून दूर गेल्यावर……..

  1. Ashfaq म्हणतो आहे:

    Khup Sunder Lihila Ahes, Roj lihit Ja Mi Roj Wachel

  2. Maithili म्हणतो आहे:

    Sahiye….khoop chaan…!!! 🙂

  3. पिंगबॅक तुझ्यापासून दूर गेल्यावर…….. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s