अमेरिकेतला TV

US मध्ये आल्या वर सगळ्यात जास्त काय खटकल असेल मला तर इथले TV channels आणि Ads ,  
 
आपल्या भारतात TV म्हणजे कित्येक जीवांचा oxygen असतो, specially दुपारच्या वेळी घरी असणाऱ्या गृहिणीचा, काय ते एकेक serials  न shows , खर बोलायचं तर मी पण रोज serials पाहत होते भारतात.. ठराविक serials एक दिवस पण चुकवायचे नाही…
i know i know  आता सगळे लगेच नाक मुरडायला न टोमणे मारायला लागतील कि काय त्या typical serial पाहते न काय काय…but the thing is   त्या serial खरच इतक्या गुंतवून ठेवतात न कि तुम्ही नाही नाही म्हणून पण रोज प्रत्येक episod पाहता, न वरून एखादा मिस झाला तर तुम्ही repeat telecast शोधून शोधून पाहता…
हे सगळ कळण्यासाठी बाईचाच जन्म घ्यावा लागेल… 🙂
 
आता विषय इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा मीच परत line वर येते, तर भारताला TV serial  आणि जाहिराती तर काय बोलू, जाहिरात कारण हि पण कला असते हे कोणी भारतीयांकडून शिकावं….
काय एकसे एक जाहिराती बनवतात. माझ्या मनाला भावलेली पहिली जाहिरात म्हणजे लहानपणी “धारा” तेलाची, त्यात तो मुलगा घर सोडून निघाला असतो न त्याला स्टेशन वर पोस्टमन काका भेटून सांगतात कि घरी आई नि जिलेबी बनवली आहे, Wow त्या वेळी त्या मुलाचे expression आहेत न, कमाल…. न मग तो जस बोलतो न “जलेबी…”, मी आज पण त्या जाहिरातीची वेडी आहे…
आणि काही काळापूर्वी आलेली menthos ची ad ,  ज्यात तो मुलगा lecture मध्ये उलटा येतो…  ती Ad पण just amazing आहे. अश्या किती तरी Ad आहेत ज्या मनात घर करून गेल्या… तसच TV serial च, पूर्वी DD1 ला लागणाऱ्या एकूण एक serial काय तुफान popular होत्या, दस्तक, फौजी, उडान, पोटलीबाबा, चंद्रकांता, महाभारत, जासून करमचंद, मोगली…. काय मस्त serials होत्या..
 
पण इथे US ला आले आणि इथल्या Ad पाहिल्या तर डोकच सटकल, अरे यार ह्या काय ad आहेत काय, २ लोक समोर समोर उभे राहतात न कोरा चेहेरा घेऊन २० ३० सेकंद काही तरी बडबडतात झाल..
इतक्या पकाऊ ad आहेत न, न plus गेल्या २ आठवड्यात मी बोटावर मोजण्या इतक्या पण ad पाहिल्या नाहीत. तीच तऱ्हा serials ची, इथे either बोरिंग commedy असेल or police किंवा वकिलांची crime based serial … no other option ..
 
So all in all, मी सध्या सगळ्यात जास्त काय मिस करत असेल तर इंडिअन TV … तशी youtube वर अधून मधून एखादी serial पाहते मी, but TV is TV…

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

18 Responses to अमेरिकेतला TV

  1. महेंद्र म्हणतो आहे:

    सिरियल पहातो हे ओपनली कमिट करायला खूप धैर्य लागतं.. 🙂 पण मी अजिबात पाहत नाही सिरियल्स.. जाहिराती.. येस्स.. काही काही खूपच सुंदर असतात, जसे फेविकॉल… अमूल..

  2. शब्दांकित म्हणतो आहे:

    watchindia.tv नावाच्या साईटवर नोंदणी करून तुम्ही भारतातले बरयापैकी सगळे TV पाहू शकता. हवे ते channel निवडूही शकता. सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांचं लाइव फीड बरोबर ऑन-डिमांड पण उपलब्ध आहे. मी काय त्यांची मोफत जाहिरात करतेय.

    पण तुझा अनुभव थोड्या फार फरकाने मलाही आला. अमेरिकन उच्चार पद्धती समजायला TV ने फार मदत झाली.

    • justtypeamruta म्हणतो आहे:

      Actualy मी हॉटेल रूम वर राहणार आहे ३ months, so मला स्वतःला हे Channels नाही order करता येणार, पण मी नक्की लक्षात ठेवेन, कोण जाणे परत याव लागल for long टर्म तर..
      खूप धन्यवाद

  3. हेरंब म्हणतो आहे:

    अमेरिकेत बघायच्या सिरियल्स सांगतो. सगळ्या कॉमेडी (sitcom) आहेत. तुम्हाला नक्की आवडतील.

    F.R.I.E.N.D.S
    Everybody Loves Raymond
    King of Queens
    Hi Dear

    • justtypeamruta म्हणतो आहे:

      नक्की पाहीन या सगळ्या serials , Actualy मी इंडिअन drama मिस करतेय, but ह्या serials नक्की पाहीन, FRIENDS बद्दल बराच ऐकल आहे,
      खूप खूप धन्यवाद

  4. bhaanasa म्हणतो आहे:

    अगं, काही आपल्या सिरियल्स मीही खूप खूप मिस करते. पण त्या सगळ्या जुन्या. इथेही काही आवडतील अशा आहेत पण आपल्याला तू म्हणलीस तसे नाट्य-भावुकता पाहण्याची जास्ती सवय व आवडही लागलेली. शिवाय त्यातून होणा~या डोकेदुखीचीही… :D.
    अगं, तुझा विरोपाचा पत्ता देशील का? माझा shree_279@yahoo.com . बोलूच गं.

    • justtypeamruta म्हणतो आहे:

      अजून सवय व्हायचीये इथल्या serials ची, सवय झाली कि सगळ गोड वाटत, हो ना? BTW मी तुम्हला mail केला आहे. reply नक्की द्या.

  5. sahajach म्हणतो आहे:

    पटापट कमॆंटते गं .. अज्याबात वेळ नाहिये बघ…. ’अर्चना-मानव’ च्या तलाक चे नक्की काय झाले पहायला जायचेय… 🙂
    कालचा भाग गेला गं नेमका माझा… मरो मेले ते ’लालीचे’ आता पुढे काय होते पहावे लागेल…. बडी ठकुराईनच गुजिया ची कातील आहे हे लोहासिंगला समजलेय….आता काय?

    समजले का तुला मला काय म्हणायचेय… थोडक्यात तुझी तगमग मला समजतेय व्यवस्थित 🙂

    शक्य नाहीये आपल्याला या सिरियल्सशिवाय आणि त्यांच्या अश्रूंच्या धबधब्याशिवाय 😉

    • justtypeamruta म्हणतो आहे:

      शप्पथ, तू पण माझ्या सारखीच काय? सही…….
      कसलं बर वाटत माहितीये कोणी तरी serial बघणार भेटलं कि… नाही तर जो तो शिव्याच देतो येत जाता…
      माझे पण मिस होतायत एपिसोड… झोप येतीये पण तरी बघतेच youtube वर आलाय का एखादा ते………..
      Thanks realy ..

  6. Aparna म्हणतो आहे:

    drama tyanchya reality shows madhe pan asto te try kar…..nahi tar online TV tu laptop war pahu shakates….watchindia.tv war ja….tujhya saas bahu pasun sagala…
    you tube war ek zee marathi cha channel pan aahe…tithe 5 minutes chya serial astat i guess…story line kalel….
    Enjoy…..

  7. ajay म्हणतो आहे:

    अगले जन्म मोहे बिटीया ही किजो सारखे विचीत्र आणि बोलताही न येणारे नावाच्या काही सिरियल्सच आमच्या घरी दररोज चिंतन होत असतं. एक वेळ आमच्या घरातील प्राब्लेम्स किंवा आयुष्यातील अडचणीपेक्षाही त्या सिरीयल मधल्या लोकांच आयुष्य चर्चेला जास्त जातं 😦 असो.

  8. अभिजित म्हणतो आहे:

    अर तू सॉनिक ची अऍड पाहिलीस का? दोन लोक कार मध्ये बसून बडबड करतात. किती बकवास आहे ती जाहिरात. टिव्ही शो (आता सिरिअल म्हणू नकोस सकाळचा नाश्ता समजतील लोक !! ) काही चांग्ले आहेत. हाऊ आय मेट युर मॉम, एव्हरी बडी लव्ह्ज रेमंड, आणि फॅमिली गाय (हे आवडायला पुरुषाचाच जन्म घ्यावा लागतो :))

    • अमृता म्हणतो आहे:

      हाहा, ते पण आहे.. माझ्या बर्याच मित्रांना हेच शो आवडतात. आणि हो पाहिली मी ती जाहिरात, खरच बकवास आहे, अजून एक फालतू जाहिरात म्हणजे प्रोग्रेसिव्ह इन्शुरन्स ची. त्यातली Model(?) पण कुठून शोधून आणली आहे काय माहित.

      • अभिजित म्हणतो आहे:

        हो ती अजिबात टिव्हीवर दिसायच्या लायकीची नाही ! ते तरी बरं लोकल वकिल, क्रिमिनल जस्टिस वाल्यांच्या जाहिराती बघितल्यास का? ती जाहिरात बघूनच कोणीही जाणार नाही यांच्याकडे.

      • अमृता म्हणतो आहे:

        एकदम correct , कसे काय लोक इथे जाहिराती सहन करतात काय माहित…

Leave a reply to justtypeamruta उत्तर रद्द करा.