बाबाचा वाढदिवस

आज बाबाचा वाढदिवस, खर तर भारतात तो आता काल झालाय. पण माझ्यासाठी आजच आहे.
 
पहिल्यांदा बाबाच्या वाढदिवसाला मी लांब आहे. म्हणजे दर वर्षी बाबांचा वाढदिवस असा काही वेगळ नसायचा. मोठ्यांचा काय वाढदिवस साजरा करायचा असा आमच्या आईच मत. त्यामुळे आईबाबाच्या वाढदिवसाला घरीच cake करणं, काहीतरी छान जेवायला करणं आणि अगदीच अति म्हणजे बाहेर जेवायला जाण ह्यापेक्षा जास्त काही नसत. पण ह्या वेळी मी एकटी इतकी लांब. काल रात्री बाबाला शुभेच्चा देताना त्याचा आवाज कातर झाला होता क्षणभर आणि माझाही हुंदका दाटून आला होता.
 
अश्यातच नचिकेतची हि पोस्ट वाचली. आईशप्पथ, हृदयात कालवाकालव होण काय असतं ना ते अश्यावेळी कळत.
 
डोक्यात एकच विचार चालू आहे तेव्हापासून, लहानपणापासून मी बाबाची लाडकी, पण मोठं होत गेले तशीतशी आईच्या जास्त जवळ आले. कदाचित बाबा सतत बदली होऊन ह्या त्या गावी असायचे, किंवा मोठ होताना आई जवळची होते म्हणून पण असेल. हे त्याच्यापासून दूर होण आणि आईजवळ येण जाणवत असेल का बाबाला?
 
मला अजूनही आठवत, दहावीच्या result च्या वेळी मला ९०% पडले म्हणून आईनी आणि मी आनंदाश्रुंचे पाट वाहिले होते, पण मन फिरवून शर्टच्या बाहीला हळूच डोळे पुसणारा बाबा मला आजही आठवतो. मी engineering admission घेताना आई तयार नव्हती, फी कुठून भरायची इतकी हेच तिला कळत नव्हत. पण बाबानी आईशी अक्षरशः भांडून मला admission घेऊन दिली. मग प्रत्येक वेळी result लागला कि अभिमानाने आईला म्हणायचा बघ मी म्हणाल नव्हत तुला. ज्या दिवशी campus interview होता त्यादिवशी सकाळी मला म्हणाला होते, tension  घेऊ नको तुझ सगळ नीट होईल माझा विश्वास आहे.  त्याच दिवशी job मिळाला.
 
संध्याकाळी तो यायच्या वेळी मी मंदिरात गेले होते, मंदिरातून येताना दारातच त्याचा कापरा आवाज ऐकू आला ” मी एका वर्षात जेवढ कमावत असेल तितकं माझी पोरगी ३ महिन्यात कमवून आणेल आता, बघ मी म्हणाल नव्हत तुला”. त्या दिवशी माझ्याकडे बोलायला शब्द उरले नाहीत. इतका अभिमान मला माझा पण कधी वाटला नसेल, तितका त्याला वाटत होता. आपली पोरगी आपल्यापेक्षा जास्त कमावते हे त्याच्यासाठी अप्रूप होत आणि इथे पैश्यासाठी जीव घेणारे लोक बघतो रोज आपण.
 
Deccan वरून  पार्वती पायथ्याला जायला कोणत्या number ची बस पकडू असं दहा वेळा phone करून विचारणारी त्याची लेक,  US ला येताना airport वर सामान कुठे चेक इन करायचं, कस जायचं हे त्याला समजवून सांगत होती. त्या वेळी काय वाटल असेल त्याला? आपली छोटीशी मुलगी मोठी झाल्याच समाधान का ती छोटी न राहिल्याच दुःख….
Advertisements

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

9 Responses to बाबाचा वाढदिवस

 1. Aparna म्हणतो आहे:

  हळवी पोस्ट आहे गं…प्रत्येक लेक खरं तर बाबांच्याही तितकीच (किंवा जास्तच) जवळ असते फ़क्त आपण प्रत्यक्ष दूर जातो नं तेव्हाच ते जाणवतं….

 2. महेंद्र म्हणतो आहे:

  हं. खरंय. मी पण सध्या त्याच स्थितीमधुन जात आहे. या वयात ( म्हणजे मुलं मोठी झाली की ) पैसा कमी पडतोच. दोन मुलांची शिक्षणं म्हंटली की कमित कमी तिन लाख रुपये लागतातच वर्षाला. इथे सरकार दरबारी भरलेला टॅक्स आणि इतर खर्च काढले तर सगळं झाल्यावर घरच……….. जाउ द्या.. पोस्ट हळवी झालेली आहे.

  • अमृता म्हणतो आहे:

   मुलांना पण कळत असते आईबाबांची धडपड, आणि प्रत्येक पालक मुलांना सगळ चांगलच द्यायचा प्रयत्न करतो.
   मुल पण समजूतदार असतात हो, जे मिळालं त्यात समाधान मानून घ्यायला शिकून जातात पटकन… आणि मुख्य म्हणजे आई बाबांची कदर करतात नेहमी…
   खूप छान वाटत तुमची प्रतिक्रिया वाचून, Thanks काका…

 3. bhaanasa म्हणतो आहे:

  अमृता, खूप हळवी झाली आहेस नं…. आईबाबा मुलांना शक्य तितकं आणि अनेकदा कुवतीच्या बाहेर जाऊनही अनेक गोष्टी देतात. त्यातून त्यांना परतफेडीची अपेक्षा कधीच नसते. फक्त आपल्या मुलांनी आपल्यावर प्रेम करावे, उपेक्षा करू नये. बास. आपली छोटीशी मुलगी मोठी झाल्याच समाधान का ती छोटी न राहिल्याच दुःख… या दोन्ही बरोबर आपली लेक अतिशय गुणी, लाघवी व हुशार असल्याचा अभिमानही. 🙂

  • अमृता म्हणतो आहे:

   एकदम खरय, एक वेळ अशी पण येते कि आईवडील आणि मुलांमध्ये दुरावा येतो. माझ पण झाला होत असं, वयच असत ते, पण जशी जशी जाणीव होते आजूबाजूच्या परिस्थितीची, मुल आपोआप समजूतदार होतात..

 4. Gaurav म्हणतो आहे:

  माझा भाऊ बाहेर परदेशात आहे, मी पण बाहेर जाण्याचा विचार करतोय,
  “आपली पोरगी आपल्यापेक्षा जास्त कमावते हे त्याच्यासाठी अप्रूप होत”
  हे वाक्य खरच भिडले…
  माझ्या घरात हेच चालले आहे.. त्यामुळे ही पोस्ट खुप जवळची वाटली, खुप senti झालीये पोस्ट..पण छान वाटले…

  • अमृता म्हणतो आहे:

   आजकाल आपण खूप मोठे वाटायला लागतो न, इतके दिवस आईबाबांच्या पंखाखाली जगणारे आपण, आता वाटत सतत नवी दिशा शोधाव. पण हे बळ पण त्यांनीच दिलंय आपल्याला ह्याची जाणीव असली कि अजून काही नको. खूप Thanks…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s