मला मराठी बोलता येत…

मला मराठी बोलता येत…
 
हे वाक्य माझा नाही… म्हणजे गैरसमज करू नका, मला तर मराठी बोलता येताच. पण हे वाक्य माझ नाहीये. हे वाक्य आहे माझ्या मध्यप्रदेश मधून आलेल्या अगदी जिवलग मैत्रिणीच.
 
आजकाल जिथ तिथ मराठीची हेळसांड पाहतो, महाराष्ट्रीयन असून पण कितीतरी जणांना  मराठी बोलायची लाज वाटे. आपलं बाळ बालवाडीत असल्यापासून कस इंग्लिश मध्ये बोलत याचा अभिमान असणारे पालक पण पाहिलेत मी. इंग्लिश आजच्या जगात गरजेची भाषा आहे मान्य. एवढच नाही तर रोजच्या वापरत इंग्लिश शब्द पण मध्ये मध्ये घालण सुद्धा मान्य. माझ मराठी देखील इतकं  इंग्लिश वर्ज्य नाहीये. पण याचा अर्थ मला माझ्या भाषेचा अभिमान नाही असा नाही.
 
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पाहिलेले छोटे छोटे अनुभव खूप सुख देतात. हि माझी MP ची मैत्रीण. अगदी मुरलेली भोपाळकर, गेली ८ वर्ष ती पुण्यात आहे, college मग आता नोकरी असा सगळ इथेच झालाय. तिला मराठी बोलायला फार आवडत. इतके वर्ष महाराष्ट्रात राहून तिला मराठीची गोडीच लागलीये. सतत मला विचारात असते कि ह्याला मराठीत काय म्हणू. त्याला कस बोलू. तिला जो कोणी महरश्त्रिअन दिसेल त्याच्याशी आवर्जून मराठीतून बोलते.
 
अशीच अजून एक मैत्रीण ती आहे काश्मिरी. college मध्ये होती माझ्यापेक्षा २ वर्ष पुढे. तिला मराठीच खूप कौतुक होत.  आपले उच्चार, आपले शब्द फार आवडायचे तिला. तिचा सगळ्यात आवडता शब्द होता “भयंकर”, म्हण्यची तो शब्द उच्चारतानाच मला भीती वाटायला लागते. 🙂  मग एक मित्र होता माझा, राजस्थान हून आलेला.तो पण college मध्ये माझ्याच वर्गात होता. त्यांनी तर मराठी शिकण्यासाठी आपल्या रूम पार्टनरचे १ महिना कपडे धुतले होते. फक्त एका अटीवर कि रोज त्याला १ तास मराठी शिकवायचं..
 
आता ह्यानंतर जर अशी लोक पहिली कि जे मराठीची लाज बाळगतात, ज्यांना चारचौघांमध्ये मराठी बोलण हा कमीपण वाटतो. त्यांना तर महाराष्ट्रातून हलकलून अश्या ठिकाणी पाठवावं, जिथ त्यांना मराठीचा “म” पण ऐकायला मिळणार नाही वर्षानुवर्ष……….
Advertisements

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

10 Responses to मला मराठी बोलता येत…

 1. अभिजित म्हणतो आहे:

  माझी बंगाली मैत्रीण मल्हारवारी, आणि कसे सरतील सये अर्थासकट म्हणून दाखवते !
  ती महाराष्ट्रात कधीच राहिली नाही. मजा येते तीचं गाणं ऐकताना.

 2. bhaanasa म्हणतो आहे:

  तर काय…मग कदाचित त्यांना कुठेतरी चुकून मराठी शब्द कानावर पडावा असे वाटेल…. कोण जाणे?

 3. पिंगबॅक मला मराठी बोलता येत… | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 4. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

  माझा एक राजस्थानी मित्र आहे .त्याला मराठी येत नाहे पण मन उधाण वार्याचे गाण त्याला खुप आवडते आणि त्याला ते पुर्ण गाण बोलताही येत…

 5. Aparna म्हणतो आहे:

  तू ही पोस्ट लिहिली आहेस ती मराठीबद्द्ल आत्मीयता म्हणून असे मानते आणि ही प्रतिक्रिया देतेय त्यामुळे गैरसमज करु नकोस. पण तुझे की, मी आणि असे सगळे एकेरी शब्द र्‍हस्व लिहायचं आता सोडून दे..
  बघ, बंगाली वगैरे लोकं मराठी बोलतात तेव्हा आपल्याला इतकं छान वाटतं मग आपण आपल्या भाषेला जमेल तितकं शुद्धही लिहायचा प्रयत्न करायला हवा. तरंच हे मराठी ब्लॉगिंग करण्याचा (आणखी) एक फ़ायदा काय?

  • अमृता म्हणतो आहे:

   मी नक्की प्रयत्न करेन. तसं मराठी शुद्धलेखन आणि मी ह्यांची लढाई अगदी शाळेपासून आहे. किती प्रयत्न केले तेंव्हा आत्ताशी थोडीफार सुधारणा आहे. पण प्रयत्न अजूनही चालूच आहेत. Thanks a lot.

 6. shubhangi म्हणतो आहे:

  mala marathi bolayala faar aavadtay

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s