.

तुला हवं होतं ना कि मी तुझ्याशिवाय जगावं, तुला माझ जग मानलं होत मी, पण तुझ्याविनाहि माझ एक जग असावं. तू दूर गेल्यावर मी रडावं पण रडत रडत का होईना स्वताची वाट स्वत शोधावी. नव्या आयुष्याकडे चालावं. तू माझा श्वास आहेस, तू माझ्या साठी जगण्याचा आधार आहेस, पण तुला मी स्वताच्या हिमतीवर उभी हवी आहे.
 
तू दूर जातोयस कारण तुला माझ्यातली मी बाहेर आणायची आहे, तुला हवंय कि रोज सकाळी मी उठेन तेव्हा माझ्या मनात पहिला विचार हा नसावा कि तुझा दिवस कसा असेल, तर हा हवा कि माझा दिवस कसा जाईल. तुला वाटतंय कि मी माझ्यासाठी हसावं, माझ्यासाठी रडावं. माझ्या मनातल्या भावना तुझ्यावर विसंबून नसाव्या, मी माझ्या दृष्टीनी जग पहाव, मी माझ्या मनाने विचार करावा. मी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. मी स्वतःच सुख स्वतः शोधावं. माझी पहाट मी डोळे भरून पहावी, माझी रात्र मी स्वप्नांनी भरून टाकावी. 
 
तू मला सोडून चाललाय कारण मला मी सापडावी.
 
सगळ मान्य आहे मला, तुझ्या शिवाय स्वताला संभाळण, तू नाही याची सवय करून घेण, तुझा विचार न कारण, तुझी काळजी न घेण. आपलं आयुष्य आपण सांभाळण,  तुझ्यापासून लांब राहाण…. तू नाहीस आता, तरी मी जगते, मी उठते, मी काम करते, जेवते,  झोपते, मी रडते, मी हसते, गाते आणि कधी कधी तरी चक्क नाचते.
 
पण तरीही तू गेल्यापासून ह्या भावना मनाला भिडत नाहीत, हसते तर हसू ओठांतून मनापर्यंत जात नाही, रडते तर अश्रू डोळ्यातून मेंदूपर्यंत जात नाहीत. तू नाही तर एका पोकळी आहे झालेली ती भरून येत नाहीये काहीही करून. मझ्या जगण्याची दिशा बदलत असेल कदाचित पण मन अजूनही तुझ्याकडेच धाव घेतंय.
 
तुझ्यापासून दूर, तुझ्याशिवाय जगतीये मी. पण तुला माझ्यातून कसं वेगळ करू?
तुला विसरून, तुझ्या मदतीशिवाय जिवंत आहे मी, पण ह्या जगण्याला जगणं तरी कसं म्हणू?
Advertisements
Posted in Uncategorized | 11 प्रतिक्रिया

नात्याचे गुंते….

माणूस राहतो ती जागा, आजुबाजूच वातावरण change झाल कि compare करायला होतच नाही? म्हणजे मी रोज ठरवते कि इथल वातावरण, इथल जग आपल्या घराशी, आपल्या नेहमीच्या आयुष्याशी compare करायचं नाही, पण विचार काही पाठ सोडत नाहीत, एक झाल कि एक काही न काही भुंगा सुरूच असतो डोक्यात.
 
मागच्या आठवड्यात मला एक मैत्रीण मिळाली आहे इथे, मी ज्या हॉटेल मध्ये राहते न, ती इथे receptionist आहे, तीच नाव आहे Viana , Sunday ला तिच्या सोबत असंच फिरायला गेले होते, तेव्हा तिच्या life बद्दल सांगत होती ती. १० वर्षापूर्वी लग्न झाल, handsome नवरा,  नवीन नवीन प्रेम, नवीन life , पण २ ३ वर्षात खरा रंग बाहेर आला, दोघांच पटेना बिलकुल, मग divorce ..
यांचे divorce पण मस्त सुखाचे असतात ना, शक्यतो भांडण नाही. मुलांची custody पण सोयीनुसार बघितली जाते, आता माझी मैत्रीण आहे ना, तिला बिलकुल स्वयंपाक येत नाही, फक्त ready to eat आणते ती, मग तिच्या दोन्ही मुलांची custody तिच्या नवऱ्याकडे, कारण तो छान स्वयंपाक करू शकतो. Week end ला मात्र मुलं हिच्याकडे असतात.
 
तिचा आत्ताचा जो boyfriend आहे ना, तो ४८ वर्षाचा आहे, आणि हि ३० ची.. त्याची जी मुलगी २० वर्षाची असताना घर सोडून निघून गेली आणि तिनी लग्न केल, त्यानंतर तिचा काही पत्ता नाही, मग माझ्या मैत्रिणीनि त्या मुलीला शोधून काढलं facebook वरून, त्या facebook च्या profile मध्ये त्या मुलीच्या बाळाचा, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या boyfriend च्या नातवाचा फोटो होता, आता तो फोटो ती प्रिंट करून आपल्या boyfriend ला बर्थडे गिफ्ट म्हणून देणार आहे…
 
काय नाती असतात ना इथे, मला राहून राहून भारताची आठवण येत होती, आपण कशी नाती जपतो, आई, वडील, नवरा, मुल, आज्जी, आजोबा….
आपण प्रत्येक जण एकेका वर्तुळाचे केंद्रबिंदू असतो, आणि त्या वर्तुळाच्या परीघांवर आपले जवळचे असतात. सगळे परीघ सारख्या त्रीज्याचे नसतीलही कदाचित, पण प्रत्येक परीघ तितकाच महत्वाचा. काही नाती मनाजवळची, काही नाती मनात नसताना निभावलेली, पण सगळ्या नात्याचे संदर्भ वेगळे, अर्थ वेगळे.
 
कित्तीतरी वेळा हि नाती, हे बंध नकोशे वाटले असतील आपल्याला, सगळे पाश तोडून दूर जावसं वाटल असेल, पण जेंव्हा आपल्या माणसांपासून दूर जातो तेंव्हा कळत, हे पाश इतक्या सहज सुटत नाहीत, मन गुंतलेलं असतं त्यात….
 
अश्या नात्यांना नेहमी जपत राहा…
Posted in Uncategorized | 6 प्रतिक्रिया

कंटाळ्यातला एक दिवस

आज सुट्टी, ते पण Monday ला… सोने पे सुहागा…

मग काय आख्खा दिवस रूम वर बसून काढला… दिवस भर इंटरनेट वर होते, एकूण एक friend ला पकवल, जुने मित्र मैत्रीण शोधले, न त्यांना पण पकवल…

आधी सकाळी late उठले, ८ ला… (हसू नका, रोज ६ ला उठायची सवय असेल तर ८ हे late च वाटत…) मग हॉटेल मधला फ्री Breakfast enjoy केला. तास त्यात enjoy करायचं काही नसतं. शुद्ध शाकाहारी असल्यामुळे bread butter न चहा शिवाय option नसतो, पण जे आहे ते गोड मानून खाल्लं. खाऊन झालं न काय कराव सुचेना, खूप bore होत होता, न एकटी राहिले कि homesick व्हायला लागत मला, So तेव्हापासून laptop जो on केलाय तो आत्तापर्यंत सुरु आहे… आज छान photos upload केले Madison चे ओर्कुट आणि पिकासा वर… सगळ्यांच्या धपाधप comments आल्या. मग त्यांना reply दिले…

दुपारी कणिक माळून २ पोळ्या लाटल्या, न मस्त आवडीची भाजी बनवली शिमला मिर्च न बटाटा mix …. 🙂 जेवण केल तासभर खेळत खेळत…

असं अन्न चिवडत जेवायला मला बिलकुल आवडत नाही, पण आत्ता जर ५ min मध्ये जेवण उरकल तर वेळ कसा घालवणार नाही का… सो……… दुपारी पुन्हा माझा laptop आणि मी… खूपच एकट वाटायला लागल तर TV लावला, जरा जरा अश्रू यायची चिन्ह दिसू लागली होती, तश्या पोरी असतातच हळव्या, पण गम्मत अशी आहे कि नको तिथ बरोबर पाणी येत, न पाहिजे तेव्हा टिपूस पण येत नाही…जाऊ दे मुलीचं रडण हा एका आख्खा नवीन विषय आहे पोस्टचा, तो परत कधी तरी… सध्या तरी पाणी यायला लागल तर डोळे घटत मिटून घेतले न झोपून गेले, ( रडण टाळायचा हा उत्तम उपाय आहे, हे अनुभवातून कळल आहे मला… ) ..

मग direct संध्याकाळी ६ लाच जाग आली… इथे संध्याकाळचे सहा म्हणजे दुपार वाटते सध्या. summer आहे ना सुरु. संध्याकाळी हॉटेलच्या receptionist शी गप्पा मारल्या तासभर आणि आले परत इंटरनेट वर… तेंवा पासून अजून पर्यंत तिमे पास च करतीये, मधेच उठून वरणभाताचा कुकर लावला न खाऊन घेतलं… ३ दिवसांच्या सुट्टीमध्ये आज पहिल्यांदा व्यवस्थित जेवले २ वेळा… नाही तर २ दिवस उगाच soup, पॉपकॉर्न खाऊन राहले होते…

असा आजचा माझा कंटाळवाणा दिवस संपला आहे, आता ४ दिवस office न काम ह्यात निम्मा वेळ जातो, so वेळ कुठे घालू हा प्रश्न जरा कमी होतो..

आता रात्रीचे साडे बारा वाजलेत, आणि माझे डोळे हळूहळू मिटायला लागले आहेत… good night all………

Posted in Uncategorized | 8 प्रतिक्रिया

अमेरिकेतला TV

US मध्ये आल्या वर सगळ्यात जास्त काय खटकल असेल मला तर इथले TV channels आणि Ads ,  
 
आपल्या भारतात TV म्हणजे कित्येक जीवांचा oxygen असतो, specially दुपारच्या वेळी घरी असणाऱ्या गृहिणीचा, काय ते एकेक serials  न shows , खर बोलायचं तर मी पण रोज serials पाहत होते भारतात.. ठराविक serials एक दिवस पण चुकवायचे नाही…
i know i know  आता सगळे लगेच नाक मुरडायला न टोमणे मारायला लागतील कि काय त्या typical serial पाहते न काय काय…but the thing is   त्या serial खरच इतक्या गुंतवून ठेवतात न कि तुम्ही नाही नाही म्हणून पण रोज प्रत्येक episod पाहता, न वरून एखादा मिस झाला तर तुम्ही repeat telecast शोधून शोधून पाहता…
हे सगळ कळण्यासाठी बाईचाच जन्म घ्यावा लागेल… 🙂
 
आता विषय इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा मीच परत line वर येते, तर भारताला TV serial  आणि जाहिराती तर काय बोलू, जाहिरात कारण हि पण कला असते हे कोणी भारतीयांकडून शिकावं….
काय एकसे एक जाहिराती बनवतात. माझ्या मनाला भावलेली पहिली जाहिरात म्हणजे लहानपणी “धारा” तेलाची, त्यात तो मुलगा घर सोडून निघाला असतो न त्याला स्टेशन वर पोस्टमन काका भेटून सांगतात कि घरी आई नि जिलेबी बनवली आहे, Wow त्या वेळी त्या मुलाचे expression आहेत न, कमाल…. न मग तो जस बोलतो न “जलेबी…”, मी आज पण त्या जाहिरातीची वेडी आहे…
आणि काही काळापूर्वी आलेली menthos ची ad ,  ज्यात तो मुलगा lecture मध्ये उलटा येतो…  ती Ad पण just amazing आहे. अश्या किती तरी Ad आहेत ज्या मनात घर करून गेल्या… तसच TV serial च, पूर्वी DD1 ला लागणाऱ्या एकूण एक serial काय तुफान popular होत्या, दस्तक, फौजी, उडान, पोटलीबाबा, चंद्रकांता, महाभारत, जासून करमचंद, मोगली…. काय मस्त serials होत्या..
 
पण इथे US ला आले आणि इथल्या Ad पाहिल्या तर डोकच सटकल, अरे यार ह्या काय ad आहेत काय, २ लोक समोर समोर उभे राहतात न कोरा चेहेरा घेऊन २० ३० सेकंद काही तरी बडबडतात झाल..
इतक्या पकाऊ ad आहेत न, न plus गेल्या २ आठवड्यात मी बोटावर मोजण्या इतक्या पण ad पाहिल्या नाहीत. तीच तऱ्हा serials ची, इथे either बोरिंग commedy असेल or police किंवा वकिलांची crime based serial … no other option ..
 
So all in all, मी सध्या सगळ्यात जास्त काय मिस करत असेल तर इंडिअन TV … तशी youtube वर अधून मधून एखादी serial पाहते मी, but TV is TV…
Posted in Uncategorized | 18 प्रतिक्रिया

तुझ्यापासून दूर गेल्यावर……..

मीटर किलोमीटरची मापं मागे पडत जातात,
जाणवतात ती श्वासांमधली अंतरं…
तुझ्यापासून दूर जाताना मला आठवत राहत तुझ्या जवळ येण,
 
तुझ वेड प्रेम, तुझी वेडी स्वप्न, तुझ्या गहिऱ्या डोळ्यातली माझी मूर्ती
तुझ्या मनातली माझ्यासाठीची माया,  तुझ्या शब्दांमधली माझी वेडी स्तुती
 
तुझ्या मनातले ते कोपरे जे खुलतात माझ्यासाठी
कधी न कळणारे काही तुझे भाव जे उमलतात फक्त माझ्यासाठी
तुझी वेडी आशा, तुझ्या पदरी आलेली कधी निराशा,
माझ्यावर प्रेम करताना तुझ्या डोळ्यात आलेली चमक,
मी तुला दुखावलं कधी नकळत तर तुझ्या डोळ्यात आलेले ते अश्रू,
 
मी जवळ नसले कि होणारी तुझी घालमेल, मला जपण्यासाठी तुझी होणारी धडपड
माझ्या ओठांवर हसू याव म्हणून होणारी तुझी तडफड
 
माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझा जडवला होता स्वर कधी,
मला निरोप देताना तुझे संपले होते शब्द कधी
माझा आवाज ऐकल्यावर तुझे संपले होते विचार तेंव्हा,
माझा स्पर्श  होईना म्हणून बधीर झाले होते तुझे हात तेंव्हा
 
आता मी आहे दूर खूप तुझ्यापासून,
पण तरी आहे मी तुझ्या मनात
तुझ्या हृदयातले भाव जाणवतात मला,
फक्त तुझ प्रेम आहे आता माझ्या मनात
Posted in Uncategorized | 7 प्रतिक्रिया

Homesick काय असतं………

घरापासून हजारो मैल दूर राहताना बऱ्याचदा असे क्षण येतात कि वाटत आपण homesick तर होत नाहीयेना?
 
सकाळी सकाळी उठून गडबडीत डब्बा बनवायचा दुपारचा, कधी पोळी कच्ची राहते तर कधी जास्त भाजल्या जाते, मग भाजीत मीठ कमी तर तिखट जास्त. पण स्वतःचा डबा तर बनवावाचा लागतो ना, मग पटापट अंघोळ उरकून देवाला हात जोडायचे, जरा रूम ठीकठाक करायची कि निघाली स्वारी office ला, पण कार मध्ये किंवा बस मध्ये बसल्यावर निवांत क्षणी आठवत.. घरी असले असते तर हातात डबा मिळाला असतो, तो पण उत्तम चवीचा. मग अचानक वाटून जात, अरे homesick तर नाही झाले ना…
 
दिवसभर office मध्ये मीटिंग, तेच ते coding न testing , कधी lunch ची वेळ टाळून जाते कळतच नाही. मग डेस्क वरच बसून एकट्यानी स्वत बनवलेला टिफिन खायचा, असंच खाता खाता आठवत… भारतात office मध्ये lunch पण एक सोहळा असायचा, आज कोणी काय आणलाय याची चर्चा breakfast टेबलवरच व्हायची. मग सगळ्यात intersting टिफिन वर सगळ्यांचा डोळा असायचा… एक दिवस काम आहे म्हणून lunch ला येत नाही म्हणाल तर सगळे ओढून घेऊन जायचे.. असंच असत का homesick होण….
 
मग संध्याकाळी office मधून घरी पोहोचायचं, स्वतःच दार उघडायचं, दिवे लावायचे, पाणी घ्यायचं… रूम तर आख्खी रिकामीच, आपलीच वाट पाहत बसणारी दिवसभर. TV on करायचा म्हणजे घरात कोणीतरी असल्यासारखं वाटत, मग आवरून चहा पीत पीत आता काय स्वयंपाक करायचा बर, असा विचार करायचा. काही तरी बनवायचं सोप्प न पटकन होणार, mostly खिचडी. तेंव्हा आठवत…. नेहमी office मधून आले पाहिलं काम डब्बे धुंडाळायचं, कोणत्या डब्यात आईनी काय भरलाय हे एकदम तोंडपाठ… न मग मी, माझा TV न बशी… इतकंच माहित असायचं मला तासभर.. खरचं मी Homesick होतेय का..
 
जेवण तयार आहे आता, as usual खिचडी टाकलीये.. रात्रीचे ११ वाजलेत बहुतेक, laptop वर ३ ४ जण ping करतायत chatting साठी, just घरी मोठ्ठा call करून झालाय.. आता जेवायला घेणार, TV वर बंडल program सुरु आहे नेहमीसारखा. मग ताटात भरपूर खिचडी घ्यायची एकदाच वाढून, न त्यावर तूप घेऊन बसायचं TV समोर… एकदाच जेवण संपवून, रात्रीचा daily status call attend करायचा. साडे बाराला दिवे गुल करायचे न पडायचं bed वर. मग आठवत कि रात्री झोपताना आई कशी ओरडायची मी न भाऊ लवकर झोपत नाही म्हणून, मग light बंद करायचा राहिलेला असायचा bathroom चा रोज, तो आईच बंद करायची. न झोपायच्या आधी एकदा डोक्यावरून हात फिरवून जायची…..
विचार करता करता लक्षात येत…. अरे, डोळ्यात तर दोन थेंब आहेत आलेले, 
 
हेच असतं वाटत homesick होण………
Posted in Uncategorized | 18 प्रतिक्रिया

3 mistakes in Madison………… :)

….
Chiacago Airport वर land व्हायच्या आधीच मी first mistake केली, handbag मध्ये medicines घेतले नाहीत, आपल्याला cough झालाय हे माहित असून पण, न AC मध्ये २३ तास काढायचेत हे माहित असून पण sweater jerkin काहीहि घेतलं नाही सोबत…
मग काय Chicago  ला पाऊल टाकल तेंव्हा मला १०३ ताप होता, तश्या तापात सगळ luggage collect केल, custom मधून clear केल.. न मग धावतपळत Madison ला जाणारी बस पकडली. एक तर बस कुठून सुटते ते माहित नाही, airport वर अगदी हातावर मोजता येतील अशी ५ ६ टाळकी, न बस ला फक्त १० minutes राहिलेले. २ मोठ्या bags , एक handbag , sack असं सगळ trolly मध्ये चढवून कशीबशी बस पकडली न जे ताणून दिली ४ तास, ते direct madision आल्यावरच उठले… न उठल्या उठल्या सगळ्यात पहिला धक्का बसला (आश्चर्याचा!!!)… बस मधून बाहेर  पाहिलं तर सूर्य बुडत होता, म्हणून just हातातलं घड्याळ पाहिलं तर रात्री चे ९ वाजले होते (घड्याळ मी chicago ला उतरल्यावर सेट केल होतं बर का)……… लगेच डोक्यात पेटलं, Welcome to US …………… Thankfully माझा team mate आला होता bus stop वर घ्यायला, So  from there ride to hotel was perfect.
 
….
मग झाली दुसरी mistake , मस्तपैकी घरी पोहोचल्याचा फोन करताना सांगितलं कि मला ताप आला आहे……
झाल, घरात जो गोंधळ, कसं होणार आता हीच, इतक्या तापात कशी राहीन, एकटी काय करेल, जेवायचं काय, आवरायचं काय……नुसते फोनवर फोन. कोण औषध सांगतय, कोण घरगुती उपाय, आईनी लगेच NJ मधल्या मावशीला फोन केला, तिचे फोन कि इथे कोणत औषध मिळत, injections काय घ्यायचे…  All in all, मी complete confuse, शेवटी सगळ सोडलं २ क्रोसिन खाल्ल्या, Vicks  चोपडल, cough  syrup घेतलं न झोपले….
 
….
आणि आता अजून पर्यंतची last न stupid mistake, दुसऱ्या दिवशी reporting होत client office वर, Teammate ची pick n drop service ready असल्याने लगेच office ला आले, मस्त new laptop मिळाला, दिवसभर पाट्या टाकून घरी आले न chatting करायला internet on केल… पहिल्या मिनिटातच laptop ओरडायला लागला, wireless network मधून Virus घुसला, सगळी system बंद.
दुसऱ्या दिवशी जी पडलीये मला manager कडून… काय विचारू नका, complete विकेट उडाली माझी, आख्खा laptop format केला….. त्यातल्या त्यात नशीब चांगल कि मी office च्या network ला connect केल नव्हत, नाही तर पूर्ण network बंद पडल असतं न मी next flight नि परत भारतात jobless होऊन आले असते……………
 
So this is it, 3 mistakes in first week of Madison, अजून काय काय होणर आहे God knows, पण सध्या तरी मला luck ची गरज आहे जबरदस्त.
Posted in Uncategorized | 10 प्रतिक्रिया